Ad will apear here
Next
‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी मेळावा
संस्थेच्या रजतजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

पुणे : येथील ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (एआयटी) माजी विद्यार्थ्यांचा मेळावा येत्या शनिवारी, २२ डिसेंबर रोजी संस्थेच्या दिघी कॅंपस येथे होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या मेळाव्याला ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने जगभरातील माजी विद्यार्थ्यांना निमंत्रित केले आहे. या मेळाव्यात उत्तम यश मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून, विविध संत्रांमधून विचारांचे आदानप्रदान होईल; तसेच काही खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. 

२२ डिसेंबरला सकाळच्या सत्रात यशस्वी उद्योजक विमल राठोड आणि अंकुश तिवारी हे ज्येष्ठ माजी विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी खुली चर्चा करतील. मुख्य सत्रात रवीन जानू संयुक्त राष्ट्रसंघात उपलब्ध असलेल्या कामाच्या विविध संधींची माहिती देतील. २००१ च्या बॅचचे विद्यार्थी मुकेश शुक्ला यांनी वेअर हाउस मॅनेजमेंट विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. संस्थेच्या प्रगतीबद्दल संचालक ब्रिगेडिअर अभय भट माहिती देतील, तर प्रा. मनोज खळदकर माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्याबद्दल बोलतील. 

कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे माजी विद्यार्थी हे तिचे ब्रँड अॅम्बेसेडर असतात. या नामवंत संस्थेचे माजी विद्यार्थी जगात सर्वत्र संस्थेचे प्रतिनिधित्व करतातच; पण एकमेकांच्या संपर्कात राहून जुने संबंध दृढ करत संस्थेला सध्याच्या स्पर्धात्मक जगाशी जोडण्याचे काम करतात. असा माजी विद्यार्थी मेळावा भरविण्याची प्रथा वर्ष २००० मध्ये  सुरू झाली. या वर्षी हा १८ वा माजी विद्यार्थी मेळावा आणि संस्थेचा रजत जयंती महोत्सव बरोबरीने साजरे होत आहेत. 

माजी विद्यार्थ्यांच्या उद्योगजगतात असलेल्या संबंधांमुळे मायक्रोसॉफ्ट, गुगल, आय. एन. ए. बेअरिंग्ज, जॉन डीअर, डेलॉइट अशा नामवंत कंपन्या संस्थेच्या कॅंपसमध्ये येऊन नोकरी साठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतात. 

संस्थेची पहिली तुकडी १९९८ साली पदवी घेऊन बाहेर पडली. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा मुख्यतः संरक्षण दलात भरती होण्याकडे कल होता; परंतु २००० नंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांनी  कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्रात नाव कमावण्यास सुरुवात केली. सैन्यातील वातावरणात वाढलेल्या आणि त्यामुळे सभोवतालच्या स्थितीशी जुळवून घेणे, सकारात्मक वृत्ती, उत्तम संपर्क कौशल्य अशा वैविध्य क्षमता असलेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना उद्योगजगतात उत्तम मागणी असते. एआयटीचे माजी विद्यार्थी समाजसेवेतही कार्यरत असून, सेवाभावी संस्थांसाठी काम करतात; तसेच उदयोन्मुख तरुणांना मार्गदर्शन करतात आणि साहसी क्रीडा प्रकारातही हिरीरीने भाग घेतात. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZOJBV
Similar Posts
‘ग्रामीण भागात ‘इनोव्हेशन’ला अधिक वाव’ पुणे : ‘विद्यार्थ्यांमधील नावीन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ अनेक उपक्रम हाती घेत असून, इनोव्हेशन पॉलिसी तयार करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात आहे; मात्र आवश्यक संसाधनांअभावी त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे
‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ची पुणे-गोवा सायकल मोहीम यशस्वी पुणे : ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली पुणे ते गोवा सायकल मोहीम बुधवारी, नऊ जानेवारी रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या मोहिमेत विद्यार्थी, सहाय्य्क कर्मचारी, प्रशासकीय सेवक मिळून ६१ जण सहभागी झाले होते.
आयटी क्षेत्रासाठी ‘सीप’चा अभिनव उपक्रम पुणे : राज्यातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने आणलेले नवे धोरण, महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर असलेल्या आयटी कंपन्यांना लागू असलेला ‘मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम’ आणि या क्षेत्रासाठीचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) नियम या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत
‘एआयटी’च्या विद्यार्थ्यांची ‘एनईसी हॅकेथॉन’मध्ये बाजी; पहिली तीनही बक्षिसे मिळवली पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली येथे झालेल्या ‘एनईसी हॅकेथॉन’मध्ये दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीनही क्रमांकांवर मोहर उमटवत एकूण पाच लाखांचे बक्षीस त्यांनी पटकावले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language